रिपोर्टर की रिपोर्ट -दीपक भोगल

मुंबई /(दहिसर पूर्व) दिनांक ३० जून २०२१ रोजी सकाळी    १० :३० च्या सुमारास गावंडे नगर, रावल पाडा येथील ओम साई राज ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या दुकानामध्ये दुकान मालक 

श्री. शेलेंद्र रमाकांत पांडे, वय ४० वर्षे राहणार दहिसर पुर्व मुंबई हे नियमित काम करीत असताना तीन अनोळखी इसमांनी दुकानात 

शिरुन त्यांच्याकडील अग्नीशस्त्रातुन दुकान मालक श्री. शैलेंद्र पांडे यांच्या दिशेने गोळया

झाडुन त्यांना गंभीर जखमी केले व दुकानातील अंदाजे २० तोळे सोन्याचे दागिने किंमत

अंदाजे रु १० लाख ची जबरी चोरी केली. नमुद जखमी श्री. शैलेंद्र पांडे यांना उपचारार्थ

रुग्णालयात आणले असता त्यांना दाखलपुर्व  मयत घोषित करण्यात आले. याबाबत   दहिसर पोलीस ठाणे येथे गु.रक्र.८९१/२०२१ कलम ४५२,३९७,३०२,३४ भादवि सह कलम  ३,२५,२७ भाहका सह कलम ३७ (९)(अ), १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला


 गुन्हयाच्या तपासादरम्यान पाहिजे आरोपींचे उपलब्ध वर्णन, तसेच गुप्त बातमीदाराकडुन

प्राप्त माहितीच्या आधारे पाहिजे आरोपींविषयी,त्यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती मिळविण्यात आली. व १० विशेष पथके नेमुन अविरतपणे तपास करुन गुन्हयातील तीन अनोळखी

आरोपी इसम व त्यांचे दोन साथीदार असे एकुण पाच आरोपींचा ठावठिकाणा शोधुन त्यांना ग्राम - बारबोधन ता. ओलपाड जि.सुरत राज्य गुजरात येथुन ताब्यात घेण्यात आले व

त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांचा गुन्हयातील सहभाग निश्‍चित झाल्याने त्यांना सदर

गुन्हयात अटक करण्यात आली.


गुन्हयातील अटक आरोपींकडुन जबरीने चोरुन नेलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने तसेच

गुन्हयात वापरलेले हत्यार एक गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले

असुन इतर दागिने तसेच गुन्हयात वापरलेले अग्निशस्त्रे हस्तगत करण्याच्या दृष्टीने अटक

आरोपींकडे कसुन तपास सुरु आहे. 


नमूद कारवाई मा. पोलीस सह आयुक्‍त ( का. व सु .) श्री. विश्‍वास नांगरे पाटील,

मा. अपर पोलीस आयुक्‍त, उत्तर प्रादेशिक विभाग श्री. दिलीप सावंत, मा. पोलीस उप

आयुक्‍त, परिमंडळ-१२, डॉ. स्वामी, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. सुहास पाटील

यांचे मार्गदर्शनाखाली प्र. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल आव्हाड, पो.नि संजय मराठे,

पो .नि रोकडे, पो .नि .लोकरे, सपोनि डॉ.चंद्रकांत घार्गे, ओम तोटावार, अभिनय पवार ,प्रविण 

निंबाळकर, पोउपनि सुनिल पोवार, शिवाजी देसाई, दुधमल, पो.ह. परब, गायकवाड, पांगे,

खडपे, तटकरे, पो.ना. शेख, मोरे, किणी, मोहिते, पोळ, सांबरेकर, केळजी, चिकणे, पोशि

शिरसाट, हिरेमठ, लहांगे, सय्यद, सागर पवार यानि   अथक परिश्रम घेवुन कौशल्यपुर्वक 

सदरचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

Post A Comment:

0 comments: